गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (19:30 IST)

रविवारी करा हे उपाय, सूर्य देव होतील प्रसन्न ज्याने जीवनात सुख येईल

जीवनात सुख-समृद्धी राहो म्हणून व्यक्ती सतत प्रयत्न करत असतो, परंतू प्रत्येकाच्या भाग्यात असे होणे सोपे नसते. अशात जीवन समस्यांनी गुंडाळलेलं दिसू लागतं. अशा परिस्थितीत साधारण उपाय अमलात आणून जीवन आनंदी कसे होईल यासाठी काही उपाय-
 
रविवारी सकाळी घरातून एखाद्या कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी गायीला पोळी द्यावी. शक्य असल्यास रविवारी गायीची पूजा करावी.
रविवारी एका पात्रात पाणी भरुन त्यात कुंकु टाकून वडाच्या झाडाला अर्पित करावे.
रविवारी घरातून बाहेर पडण्यापूर्वी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.
मासोळ्यांना क‍णकेच्या गोळ्या बनवून खायला द्याव्या.
मुंग्यांना खोबरं आणि साखरेचा बुरा मिसळून खायला द्यावा.
शुद्ध कस्तूर चमकदार पिवळ्या कपड्यात गुंडाळून रविवारी आपल्या तिजोरीत ठेवावं.
या दिवशी व्रत करत असाल तर एका वेळी मीठाचे सेवन टाळावे.
भक्तिभावाने हे उपाय केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
 
या उपयांनी देखील सूर्य देव होतात प्रसन्न
रविवारी वडाच्या झाडाच्या पानांवर हळदीने स्वस्तिक काढून घरात ठेवावे.
रविवारी धनासंबंधी कार्य करु नये, याने दारिद्रय येतं.
रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि सूर्य उपासना करावी.
रविवारी गरीब, गरजू, आजारी, किन्नर या लोकांची सेवा करावी.
रविवारी शुभ मुहूर्त बघून काळ्या हळदीची गाठ घरात किंवा दुकानात आपल्या तिजोरीत ठेवावी, याने यश प्राप्ती होते.
रविवारी आदित्य हृद्य स्त्रोत पाठ करावं.