बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (07:06 IST)

शनी अमावस्या : शनी देवाला अर्पित करा हा खास विडा आणि मिठाई

शास्त्रांमध्ये शनि अमावस्येचं अत्यंत महत्तव आहे. हा दिवस धार्मिक दृष्ट्टा पवित्र मानला गेला आहे. या दिवशी तेलात तयार करण्यात आलेली सामुग्री शनीदेवाला अर्पित करावी परंतू जर आपण 5 मिठाईचे उपाय केल्यास सर्व समस्या नाहीश्या होतील.
 
विडा कसा असावा : विडा तयार करणार्‍यांना अंदाज असतो की देवाला कशा प्रकाराचा विडा अर्पित केला जातो. तरी आपण त्याला गोड शाही विडा तयार करायला सांगावा. यात खोबरं, 
गुलकंद असावं परंतू तंबाखू आणि इतर सुवासिक वस्तू नसाव्यात.
 
शनी अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरात पिंपळाच्या मुळापाशी तीळ गूळ मिश्रित जल प्रवाहित करावे. आता पिंपळाचे खाली पडलेले 5 पाने घेऊन हातांनी किंवा पाण्याने स्वच्छ करावे. 
त्यावर 5 वेगवेगळ्या प्रकाराच्या मिठाई ठेवाव्या. दिवा लावावा. विडा उघडून समोर ठेवावा. पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिरा घालाव्या आणि मिठाई आणि विडा तेथेच ठेवून घरी परत 
यावे.
 
5 मिठाई कोणत्या -
1. इमरती
2. जिलबी
3. गोड पुए किंवा गुलगुले
4. मालपुआ
5. पेठा
 
शनिवारी किंवा शनी अमावस्येला हा खास विडा आणि मिठाई अर्पित केल्याने शनी देव प्रसन्न होऊन वरदान देतात.