मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

dattatreya ashtakam
दत्तात्रेयाची मूर्ती किंवा चित्र घरात स्थापित करावे. चित्रासमोर मातीच्या घड्यावर चारी बाजूला पवित्र झाडाची पाने लावून एक पाणी असलेलं नारळ ठेवलेलं कळश स्थापित करावे. त्या समक्ष चारमुखी दिवा लावावा. स्वत: पिवळे वस्त्र धारण करावे. पिवळ्या रंगाचे आसान वापरावे आणि खालील दिलेल्या मंत्राने चंदनाची माळ वापरत 7 माळी जपाव्या. 
 
जप पूर्ण झाल्यावर कन्या भोज किंवा गोड प्रसाद, श्रृंगार सामुग्री आणि दक्षिणा अर्पित करुन इच्छित फल प्राप्ती होऊ शकते.
 
मंत्र- उं झं द्रां विपुलमुर्तेये नम: स्वाहा ।। 
 
परीक्षेत यश मिळविण्यासाठी
दत्तात्रेय प्रभूंचे चित्र स्थापित करुन त्याच्यासमोर तांब्याच्या ताम्हणात खीर प्रसाद म्हणून ठेवावी. देवासमोर विड्याचे तीन पान घेऊन त्यावर अक्षतांचे लहान-लहान ढिग बनवावे. देवाला पांढरे वस्त्र अर्पित करावे आणि लाल कांबळे आसान म्हणून वापरावे आणि खालील दिलेलं मंत्राच्या तुळशीच्या माळीने 5 माळी जपाव्या.
 
मंत्र- ।। ऊं विध्याधिनायकाय द्रां दत्तारे स्वाहा ।।