बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified शनिवार, 13 मार्च 2021 (07:10 IST)

Shani Amavasya 2021 : या उपयांनी प्रसन्न होतील शनी देव, नोकरी संबधी त्रास दूर होतील

हिंदू धर्मात शनी अमावस्येचं विशेष महत्व है। यंदा ही तिथी 13 मार्च 2021 रोजी असून शनिवारी अमावस्या असल्यामुळे शनैश्चरी अमावस्या योग बनत आहे. ज्योतिष शास्त्रात शनी दोष, साडेसाती किंवा ढय्या याने पीडित जातकांसाठी शनी अमावस्येचा दिवस शुभ मानला गेला आहे. या दिवशी शनी देवाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते.
 
अमावस्येचं शास्त्रांमध्ये विशेष महत्व असल्याचे सांगितले गेले आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे याचे महत्त्व अजूनच वाढले आहे. या दिवशी लोक नोकरी संबंधी त्रासांपासून 
मुक्तीसाठी उपाय करतात. जाणून घ्या शनिदेवाला प्रसन्न करुन नोकरी संबंधी त्रास कशा प्रकारे दूर करता येऊ शकतात-
 
1. पिंपळाच्या झाडाची पूजा - शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा सर्वात फलदायी मानली गेली आहे. पिंपळाच्या झाडावर सर्व देवी- देवतांचा वास असतो. शनी 
देवाच्या दुष्प्रभावापासून बचावासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने शनी दोष नाहीसा होतो असे म्हणतात.
 
2. शमीच्या झाडाची पूजा- शनी देवाला शमी वृक्ष प्रिय आहे. शनि दोषापासून सुटका मिळविण्यासाठी शमी वृक्षाची पूजा करावी. शनिवारी संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ दिवा 
लावल्याने लाभ मिळतो.
 
3. हनुमानाची पूजा - शनि देवाला हनुमानाचे परममित्र म्हटले गेले आहे. शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनी देव प्रसन्न होतात. या दिवशी शनी दोषापासून सुटका मिळविण्यासाठी 
हनुमान चालीसा पाठ करावा.
 
4. गाय पूजा- शनी देवाच्या प्रकोपापासून बचावासाठी शनिवारी काळ्य रंगाच्या गायीची सेवा करावी. गायीला चारा आणि पोळी खाऊ घालावी. असे केल्याने शनी पीडापासून मुक्ती 
मिळते.