पांढरे केस होत आहे, हे घरगुती उपाय अवलंबवा
आजच्या काळात केसांची गळती,केस पांढरे होणे या सारख्या समस्या उद्भवतात. बदलती जीवनशैली, चुकीचे खाणे-पिणे रासायनिक सौंदर्य उत्पादनांचा वापर या मुळे या अकाळी केस पिकतात म्हणजे पांढरे होतात. काही लोक केसांना काळे करण्यासाठी डाय किंवा मेंदी लावतात. पण केसांना काळे करण्यासाठीची पद्धत चुकीची आणि तात्पुरतीची आहे. आम्ही सांगत आहोत काही घरगुती टिप्स ज्यामुळे आपण केसांना नैसर्गिकरित्या काळे करू शकता. चला तर जाणून घेऊ या.
1 कडीपत्ता - कडीपत्ता हे केसांना काळे करून केसांची वाढ करतो. या साठी कडी पत्त्यात 2 चमचे आवळा पूड आणि 2 चमचे ब्राह्मी घालून मिसळा. हे केसांना हेयर मास्क सारखे वापरा एक तास तसेच लावून ठेवा नंतर सौम्य शॅम्पूने धुवून घ्या.
2 नारळाचे तेल- लिंबाचा रस नारळ तेलात मिसळून लावल्याने केस काळे होतात. आपण हे एकत्र करून स्कॅल्पला लावून मॉलिश करा. केस नैसर्गिकरित्या काळे होतात. आपण नारळाच्या तेला ऐवजी बदामाचे तेल देखील घेऊ शकता.
3 ब्लॅक टी- एक कप पाण्यात 2 चमचे ब्लॅक टी आणि एक चमचा मीठ मिसळून उकळवून घ्या आणि पाणी थंड होऊ द्या. हे थंड झाल्यावर गाळून केसांवर लावून वाळू द्या. नियमितपणे हे वापरा. केस काळे होतात.
4 कांद्याचा रस- 2 -3 चमचे कांद्याचा रस 1 चमचा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल मिसळून केसांची मॉलिश करा आणि अर्ध्या तासानंतर धुवून घ्या. कांद्याचा रस केसांना काळे करतो आणि केसांची वाढ करतो. या मध्ये मिसळलेला लिंबाचा रस केसांना नैसर्गिक चमक देतो.