शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (19:39 IST)

केसांची गळती होत असेल तर या गोष्टींचे सेवन करू नका

बदलत्या जीवनशैली मुळे आणि आहारामुळे सध्या प्रत्येक व्यक्ती केसांच्या गळतीने त्रस्त आहे. बराच काळ उपचार घेऊन देखील ही समस्या काही कमी होत नाही. या साठी आपल्याला आपल्या आहारात अशा काही गोष्टी टाळाव्या लागतील ज्यांच्या मुळे केसांची गळती अधिक वाढेल. चला तर मग जाणून घेऊ या की अशा कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये. 
 
1 तळकट खाणे- जर आपल्याला तेलकट खाणे आवडत असेल तर हे खाणे टाळावे. या मुळे. आपल्यावर कोणतेही औषधोपचार प्रभाव पाडणार नाही. तेलकट खाण्याने स्कॅल्प तेलकट होतात. या मुळे तेलकटपणा तसाच राहतो आणि छिद्र बारीक होतात. केसांची गळती वाढते. 
 
2 आईस्क्रीम खाऊ नका- उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे कोणाला आवडत नाही. सध्या शुगरफ्री आईस्क्रीम देखील मिळतात. या मुळे ते खाऊन लोक निरोगी राहतात. जर आपण देखील केसांच्या गळतीमुळे त्रस्त आहात तर आपल्याला देखील आईस्क्रीम खाणे टाळावे लागेल. कारण आईस्क्रीमच्या सेवनाने हार्मोन्स असंतुलित होतात. इन्स्युलिन आणि अँड्रोजन वर देखील प्रभाव पडतो या मुळे केसांच्या गळतीचा त्रास तसाच राहतो.   
 
3 मद्यपान- केसांच्या गळतीसाठी मद्यपानाचे सेवन करत असाल तर बंद करा. या मुळे केसांची गळती होते. हे केसांच्या प्रथिन सिंथेसिस वर नकारात्मक प्रभाव टाकतात. या मुळे केस कमकुवत होतात. तसेच केस पांढरे होतात. या साठी मद्यपान करू नये. 
 
4 साख्रर- जर आपण अधिक प्रमाणात साखरेचे सेवन करता तर हे करणे टाळावे. इन्स्युलिन प्रतिरोध आपल्या केसांच्या गळतीसाठी कारणीभूत असतात. या मुळे केसांची गळती होते. म्हणून साखर खाणे थांबवा.