जोडीदाराशी मतभेद झाले असल्यास या चुका करू नका
असं म्हणतात की ज्या जोडप्यांमध्ये भांडण असतात त्यांच्या मध्ये प्रेम देखील अधिक असते. परंतु बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की आपसातील मतभेद विकोपाला जातात आणि त्यामुळे वादाचे वितंडवात होऊन भांडणे विकोपाला जाऊन नात्यात दुरावा आणतात. अशा परिस्थितीत दोघानी समजूतदारीने घ्यायला पाहिजे. जेणे करून नात्यात काही दुरावा येऊ नये. आपले मतभेद जोडीदाराशी झाले असेल तर आपण या गोष्टी करणे टाळावे. जेणे करून मतभेद किंवा भांडणे संपतील. चला तर मग जाणून घेऊ या काय करू नये.
* इतरांशी तुलना करू नका- भांडण झाले असेल तर असे बघितले जाते की भांडण करताना जोडपे एखाद्या दुसऱ्या जोडप्यांचे उदाहरण देतात असं करू नका. अशा मुळे भांडण अजूनच वाढतात.
* कोणाला सांगू नका- आपल्यातील भांडण्याची चर्चा इतरत्र करू नका. अशा मुळे आपले नाते बिघडू शकतात. फोन वर देखील बोलताना जास्त हसू नका, या मुळे जोडीदाराला असे देखील वाटू शकते की आपण त्याचा कडे बघून हसत आहात. असं दाखवा की आपल्यामध्ये भांडण झालेच नाही.
* जास्त बाहेर फिरायला किंवा खरेदीला जाऊ नका- आपले जोडीदाराशी भांडणे झाले असेल तर आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला किंवा खरेदीला जाऊ नका. आपले तर मूड ठीक होईल पण आपल्या जोडीदाराचे मूड अधिकच खराब होईल. तर असे करणे टाळावे. आपण एकटे जाण्या ऐवजी आपल्या जोडीदाराला समजावून मनवून गोड बोलून त्याला देखील फिरायला न्यावे. असं केल्याने आपले नातं देखील दृढ होईल. आणि आपसातील मतभेद आणि भांडणे संपतील.