सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (19:30 IST)

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या. त्या जंगलाच्या मधोमध एक नदी होती त्याच्या वर एक अरुंद पूल होते.हे पूल एवढे अरुंद होते की त्या पुलावरून एकावेळी एकच प्राणी जाऊ शकत होते.
एके दिवशी त्या दोन्ही शेळ्यांना त्या पुलावरून परस्परं विरोधी दिशेने जायचे होते. त्या एकाच वेळी त्या पुलावर आल्या आणि माझी वाट सोड मला पुलावरून अलीकडे जायचे आहे सांगू लागल्या." मला आधी जाऊ दे "असं म्हणत दोघी भांडत होत्या.कोणीही माघार घ्यायला तयार नव्हत्या. त्यांची वादावादी विकोपाला जाऊन पोहोचली आणि दोघी भांडत भांडत पुलाच्या मधोभागी जाऊन पोहोचल्या जिथे पाण्याचा प्रवाह जास्त होता. एक शेळी म्हणाली मी आधी पूल ओलांडणार मी आधी आले तू माघार घे. दुसरी म्हणाली मी का माघार घेऊ तू माघार घे. असं म्हणत दोघींमध्ये वाद वाढत गेला. त्यांना हे देखील लक्षात आले नाही की त्या पुलाचा मधोमध उभारल्या आहेत आणि याच्या खाली नदीचा प्रवाह जास्त असून नदी खोल आहे. दोघींची हाणामारी सुरू होतातच, त्या दोघी नदीत जाऊन पडल्या आणि नदीच्या वेगवान प्रवाहात वाहत गेल्या आणि मरण पावल्या. 
 
तात्पर्य- 
भांडण करून कोणत्याही समस्येचे समाधान निघत नाही. भांडल्याने नुकसान होतो.नेहमी शांततेने मार्ग काढायचे असतात.