शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (19:37 IST)

बोध कथा :विश्वासघाताचे फळ

बऱ्याच वर्षापूर्वी हिम्मत नावाच्या एका नगरात दोन चांगले मित्र धर्मबुद्धी आणि पापबुद्धी राहायचे. एके दिवशी पाप बुद्धीच्या मनात आले की आपण परदेशात जाऊन पैसे कमवायचे त्याने विचार केला की तो आपल्या मित्राला धर्मबुद्धी ला देखील घेऊन जाईल म्हणजे आम्ही दोघे मिळून खूप पैसे कमावू. येताना मी ते पैसे धर्मबुद्धीकडून घेऊन घेईन.अशा प्रकारे मी खूप श्रीमंत बनेन. आपल्या या योजनेला साकार करण्यासाठी त्याने आपल्या मित्राला बरोबर नेले. 
 
दोघांनी तिथे जाऊन खूप पैसे कमाविले आणि काही महिने तिथेच राहून आपल्या घराकडे यायला निघाले. पापबुद्धी आपल्या मित्राला जंगलातून आणत होता. त्याने धर्मबुद्धीला म्हटले की आपण एवढे पैसे नेले तर एखादा चोर दरोडा टाकू शकतो किंवा कोणी मागू शकतो. असं होऊ नये म्हणून आपण अर्धी संपत्ती याच जंगलात लपवून ठेवतो. पापबुद्धीने म्हटलेली गोष्ट धर्मबुद्धीला पटली तो तयार झाला. 
त्यांनी एक खड्डा खणून झाडाजवळ ते पैसे पुरून दिले. काही दिवसा नंतर पाप बुद्धीने धर्मबुद्धीला न सांगता गुपचूप येऊन पैसे काढून घेतले.एके दिवशी धर्मबुद्धी पाप बुद्धी कडे गेला आणि म्हणाला की मला पैशाची गरज आहे चला आपण जंगलातून काढून आणू. पाप बुद्धी तयार झाला. तिथे गेल्यावर खड्ड्यात त्यांना पैसे मिळत नाही त्यावर पाप बुद्धी धर्मबुद्धीवर चोरी करण्याचा खोटा आळ घेतो. गोष्ट न्यायालयात पोहोचते.
न्यायाधीशांनी सर्व घडलेले ऐकले आणि खरं काय आहे जाणून घेण्यासाठी परीक्षा घेण्याचे ठरविले. नंतर न्यायाधीशाने दोघांना आगीत हात घालायला सांगितले. धूर्त पापबुद्धी म्हणाला की आगीत हात घालण्याची काहीच गरज नाही. जंगलातील वनदेव खरे काय आहे ते सांगतील. ते सर्व जंगलात गेले. धूर्त पापबुद्धी वाळलेल्या झाडात लपून गेला. न्यायाधीश वन देवतांना विचारतात की चोरी कोणी केली आहे लगेच झाडातून पापबुद्धी धर्मबुद्धीचे नाव घेतो. हे ऐकतातच ज्या झाडात पाप बुद्धी लपला होता त्या झाडाला आग लावण्यात आली .झाडाला आग लागतातच जळलेल्या अवस्थेत पापबुद्धी बाहेर निघतो आणि कशा प्रकारे त्यांनी धर्मबुद्धीवर चोरीचा खोटा आळ लावला आणि सर्व पैसे लुबाडले ते सांगतो. न्यायाधीशांना खरं काय कळल्यावर  पापबुद्धी ला शिक्षा म्हणून फांशावर देण्यात आले आणि सर्व पैसे धर्मबुद्धी ला देण्यात आले.
 
तात्पर्य - जे दुसऱ्यांचे वाईट चिंतितो, त्यांचेच नेहमी  वाईट होते.