सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (17:50 IST)

बोध कथा : बेडूक आणि उंदीर

एका जंगलात एक छोटं जलाशय होतं. त्यामध्ये एक बेडूक राहत होता. त्याला एकटेपणा जाणवत होता. त्यासाठी त्याला एखाद्या मित्राची गरज भासत होती. एके दिवशी त्या जलाशयाच्या जवळच्या झाडाच्या खालून एका बिळातून एका उंदीर बाहेर निघाला. त्या उंदीरनें बेडकाला विचारले की मित्रा, "काय झाले तू उदास का बरं आहेस?" या वर बेडकाने उत्तर दिले की " मला कोणीही मित्र नाही ज्याच्या कडे मी मनमोकळे गप्पा करू शकेन. त्याचे म्हणणे ऐकून उंदीर म्हणाला, " अरे ! आज पासून मीच तुझा मित्र आहे असे समज, मी नेहमी तुझ्या बरोबर राहीन.'' असं ऐकून बेडूक आनंदी झाला. 
ते दोघे मित्र तासंतास गप्पा करायचे. आपल्या मनातले एका मेकांना सांगायचे. कधी बेडूक उंदीरच्या बिळात जायचा तर कधी उंदीर जलाशया जवळ गप्पा करायला यायचा. दिवस सरत गेले. एके दिवशी बेडकाच्या मनात आले की मी तर उंदराच्या घरात जातो पण कधी उंदीर माझ्या जलाशयाच्या घरात येत नाही .ह्याला कसे काय माझ्या घरात आणू. असा विचार करत त्याला एक युक्ती सुचली. त्याने उंदराला म्हटले की," मित्रा आता आपली मैत्री खोल झाली आहे असं काही करावं की एकमेकांची आठवण आल्यावर त्याची जाणीव झाली पाहिजे. पण आपण काय करावे ? धूर्त बेडूक म्हणाला की ' या साठी आपण एका दोरीचे एक टोक तुझ्या शेपटी ला आणि दुसरे टोक माझ्या पायाला बांधून द्यावे. आपल्याला एका मेकांची आठवण आल्यावर लगेच दोरी ओढा, म्हणजे कळेल. उंदराला बेडकाच्या धूर्तपणाचे काहीच माहीत नव्हते. म्हणून तो असं करायला तयार झाला. बेडकाने त्या उंदराच्या शेपटीला दोरी बांधली आणि स्वतःला देखील दोरीचे एक टोक बांधले आणि लगेच पाण्यात उडी मारली. तो आनंदी होता कारण त्याने विचार केलेली युक्ती काम करत होती.  त्याच्या सह उंदीर पण पाण्यात पडला परंतु त्याला काही पोहता येत नव्हते तो पाण्यात बुडून मेला.   
या सर्व प्रकाराला एका बाज वरून बघत होता त्याने मेलेला उंदीर बघून त्याला लगेच तोंडात दाबण्यासाठी खाली आला आणि उंदराला घेऊन गेला. त्या उंदराच्या शेपटीला बेडूक बांधला गेला होता त्या मुळे तो देखील त्या बाजाचा शिकार बनला अशा प्रकारे बेडकाला देखील आपले प्राण गमवावे लागले. 
 
तात्पर्य- दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्यांचे नेहमी नुकसानच होते.