मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (15:58 IST)

डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

कोरोनाकाळात सध्या लोक डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा ऑनलाईन सल्ला घेणं योग्य समजत आहे. डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
व्हिडियो किंवा फोन वरून कॉल करण्यापूर्वी आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी सहज आहात किंवा नाही हे समजून घ्या नंतरच डॉक्टरांना कॉल लावा. आपण जर व्हिडीओ कॉल वर बोलताना स्वतःला असहज आहात तर आपण साधा कॉल करून देखील बोलू शकता. 
 
आपण ज्या डॉक्टरांचा सल्ला फोन वरून घेत आहात ते डॉक्टर शासकीय नोंदणीकृत यादीमध्ये नोंदणीकृत आहे किंवा नाही ह्याचा तपास करा.अनोळखी डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळा.
 
ऑनलाईन सल्ला घेताना डॉक्टरांना आपल्या संपूर्ण त्रासा बद्दल सांगून द्या त्यांच्याशी काही लपवून ठेवू नका. नाही तर ते आपल्याला योग्य औषधोपचार देण्यास असक्षम होतील. 
 
आपण या पूर्वी कोणते औषधें घेतले असतील तर त्या संदर्भात डॉक्टरांना सांगावे. डॉक्टरांकडे आपल्या जुन्या औषधांची माहिती असावी. 
 
लक्षात ठेवा की डॉक्टरने औषधांचे नाव सांगितल्यावर त्यांचा कडून ते व्हाट्सअप करून किंवा स्कॅन करून मागवावे.