शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified मंगळवार, 15 जून 2021 (14:33 IST)

लाल किताब : गुळ खाण्याचे महत्त्व

भारतीय परंपरेत ऊस आणि गुळाचे खूप महत्त्व आहे. हे आरोग्य तसंच ज्योतिष उपाय म्हणून देखील वापरलं जातं. गुळ आणि तुप मिसळून कंड्यांवर धूप दिल्याने गृहक्लेश आणि ग्रहदोष नाहीसे होतात. तरच जाणून घ्या लाल किताब यात गुळ खाण्यासाचा सल्ला का दिला जातो.
 
1. लाल किताब प्रमाणे गुळ आणि गहू सूर्य ग्रहाच्या कारक वस्तु आहेत.
 
2. पत्रिकेत सूर्य कमकुवत असल्यास गुळ खाऊन पाणी पिऊन कोणतेही कार्य आरंभ करावे.
 
3. वाहत असलेल्या पाण्यात गुळ वाहत घातल्याने सूर्यसंबंधी दोष दूर होतात.
 
4. 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गुळ रविवारपासून आठ दिवसापर्यंत मंदिरात भेट करावं.
 
5. सूर्य द्वादश भावात असल्यास माकडांना गुळ खाऊ घालावा.
 
6. शुद्ध गुळ घरात ठेवावं आणि अधून-मधून खात राहिल्याने सूर्य बळवान होतो.
 
7. कोणत्याही प्रकारची भीती असल्यास हनुमानजीच्या मंदिरात तांब्‍याच्या भांड्यात गूळ दान करा. आणि तिथेच बसून धूप-दीप जाळून हनुमान चालीसा पाठ करावा. असं काही मंगळवार आणि शनिवार करावं.
 
8. हनुमानाला गुळ आणि चण्याचा प्रसाद अर्पित केल्याने त्यांची कृपा राहते.
 
9. आहारात गुळाचा वापर केल्याने आरोग्याला फायदा होतो आणि जरा-जरा गुळ खात राहिल्याने धनाची आवक वाढते.
 
10. मंगळवारी सव्वा किलो गुळ जमिनती दाबून ठेवल्याने भाऊ-बहिणीत द्वेष-वाद दूर होतात.