1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (11:09 IST)

भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

राज्यात गोळीबारातून हत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर नंतर चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.चाळीसगावचे नगरपालिकेचे माजी नगर सेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी गोळीबार केला होता.

या गोळीबारात महेंद्र हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.त्यांना नाशिकच्या रुग्णालयात नेण्यात आले असता उपचाराधीन असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वर हल्ला करणारे मारेकरी सात जण आले होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या साठी पोलिसांनी तीन पथके तैनात केली असून त्यांचा शोध घेत आहे.   
 
भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे बुधवारी त्यांच्या कार्यलयात बसले असताना पाच अज्ञातांनी कार्यालयात प्रवेश केला त्यांच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता तर हातात पिस्तूल होते. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit