सोलापुरात नर्तकीमुळे माजी उपसरपंचाची स्वतःला गोळ्या झाडत आत्महत्या
सोलापुरात तालुका गेवराईच्या लुखामसला गावाच्या माजी सरपंचाने प्रेयसी असलेल्या नर्तकीला भेटायला आल्यावर तिच्या घरासमोर कार मध्ये बसून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. मयत गोविंदाच्या मेहुण्याने संशयित नर्तकीच्या विरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे नेहमी कला केंद्रात यायचे दीड वर्षांपूर्वी त्यांची कला केंद्रात तालुका बार्शी सासुरे परिसरातील एका नर्तकीशी ओळख झाली त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचे रूपांतरण प्रेमात झाले. बर्गे यांच्याकडून अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील झाले. नर्तकीने त्याच्याकडून वेळोवेळी पैसे, सोने, तिच्या मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट, जमीन घेतली आणि भावाच्या नावावर पाच एकर शेती, घर करण्यास सांगितले. असं केले नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली.
काही दिवसांपूर्वी त्या नर्तकीने गोविंद यांना दुर्लक्ष करणे सुरू केले आणि त्यांच्याशी संपर्क तोडला. या मुळे बर्गे हे नैराश्यात गेले आणि प्रेयसी नर्तकीशी बोलण्यासाठी सोमवारी मध्यरात्री गेवराईवरून सासुरें आले आणि त्यांनी प्रेयसीला कॉल केला. अनेकदा कॉल करून देखील तिने कॉल घेतला नाही. आणि भेटली नाही. नैराश्यात येत गोविंद बर्गे यांनी प्रेयसीच्या घरासमोर कारमध्ये बसून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळतातच बघणाऱ्यांनी गर्दी केली. वैराग पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोविंद यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविले. त्याच्या मृतदेहाजवळ विनापरवाना असलेली पिस्तूल मिळाली आहे. ही पिस्तूल त्याच्याकडे कुठून आली याचा शोध पोलीस घेत आहे. गोविंदाच्या मेहुण्याने संशयित नर्तकीच्या विरुद्ध पोलिसांत फिर्याद केली असून नर्तकीच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
Edited By - Priya Dixit