शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (07:53 IST)

जामनेरचे माजी नगराध्यक्ष ललवाणींसह इतरांविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह इतरांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी जामनेर शहरात व तालुक्यात खळबळ माजली आहे. सदर गुन्हा अहमदनगर येथून जामनेर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
 
एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सदर फिर्याद दिली असून त्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस झुंबरलाल ललवाणी, चंदुलाल कोठारी, सुनील कोचर ,वृषभ विकास ललवाणी, भावना ललवानी, भावेश ललवाणी आदींची नावे नमूद आहेत.सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.122/21 भा.द.वि. 354( अ), पोस्को कलम 12 सह विवाह प्रतिबंध कलम 11 नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.