बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (09:48 IST)

माजी आमदाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न

भाजपच्या एका माजी आमदाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हे माजी आमदार लातूर जिल्ह्यातील उदगीरचे असल्याचं कळतंय. ही घटना 22 मे रोजी वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी सदर महिलेस आत्महत्येपासून परावृत्त केलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कौटुंबिक वादातून माजी आमदाराच्या पत्नीने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
वाशी खाडी पुलावर ब्रीजवर चढून एक महिला रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी सदरील महिलेल्या आत्महत्या करण्यापासून रोखलं. तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर ती महिला एका माजी आमदाराची पत्नी असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. वाशी पोलिसांनी त्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांना मानखुर्द पोलिसांकडे सुपूर्द केलं. कौटुंबिक वादातून तणाव निर्माण झाल्यामुळे संबंधित महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.