रविवार, 6 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (11:25 IST)

माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके  यांचे दिर्घ (Junnar) आजाराने काल रात्री वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. बेनके यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघातून सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यात ते चार वेळा विजयी झाले. ते प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे 2014 पासून सक्रिय राजकारणापासून दूर होते.

दीर्घ आजारामुळे त्यांचे अवयव देखील निकामी झाले होते. आज चाकणच्या खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आमदार अतुल, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit