रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (20:06 IST)

माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

Prataprav sonavane
social media
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते, धुळे मतदारसंघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे (वय 75) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय लाघवी व मनमिळावू असलेल्या प्रतापदादा यांचा आज 75 वा वाढदिवस होता व आजच्या दिवशी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतापदादा सोनवणे हे जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती, अध्यक्ष व चिटणीस म्हणून कामकाज केले आहे. त्यांचे वडील स्व.नारायण मन्साराम सोनवणे हे देखील बागलाण मतदार संघाचे आमदार होते.
 
त्यांच्या पश्चात पत्नी शोभाताई सोनवणे, मुलगी पल्लवी संतोष पाटील, सोनिया साकेत घोडके, मुलगा तुषार प्रताप सोनवणे व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा डिसुझा कॉलनी, गंगापूर रोड येथील त्यांच्या 'कामधेनू' या निवासस्थानापासून दुपारी 3 वाजता निघाली.

Edited by -Ratnadeep Ranshoor