मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (17:55 IST)

Derek Stirling Passed Away : न्यूजीलँडचे माजी क्रिकेटपटू डेरेक स्टर्लिंग यांचे निधन

Derek Stirling  Passed Away :क्रिकेट विश्वातून वाईट बातमी येत आहे. न्यूजीलँडचे माजी क्रिकेटपटू डेरेक स्टर्लिंग यांचे वयाच्या 62 वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. डेरेक हे माजी वेगवान गोलंदाज होते. 
 
डेरेक स्टर्लिंग यांनी न्यूजीलँडच्या संघाकडून 2 वर्षाच्या कारकिर्दीत 6 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले होते. त्यांनी कसोटीत 13 विकेट्स घेतले होते. त्यांना 6 विकेट्स घेण्यात यास 
 स्टर्लिंग यांचे देशांतर्गत क्रिकेट मध्ये आकडे भारावून टाकणारे आहे. ते वेलिंग्टन संघाकडून 1988 ते 1992 दरम्यान खेळण्यापूर्वी 1981 ते 1988 दरम्यान सेंट्रल डिस्ट्रिक्टस कडून खेळले. 6 गडी बाद करुन 75 धावा ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
 
त्यांनी 22.26च्या सरासरीने आणि 4.23च्या इकॉनॉमी रेटने 90 विकेट्स घेतल्या होत्या. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती
 त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

Edited by - Priya Dixit