शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (21:03 IST)

राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्जत- खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात हा प्रवेश सोहळा झाला. तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी आमदार सुरेश लाड यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असे सूतोवाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.  
 
रायगड जिल्ह्यातून उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगडचे सरचिटणीस सतीश धारप, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर , उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, रायगड संयोजक नितीन कांदळगावकर, रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर , कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे आदी उपस्थित होते.

Edited by -Ratnadeep Ranshoor