शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (15:25 IST)

फ्लायओव्हरवरून ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

death
नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने तीन दुचाकी स्वारांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लोक ८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. गणेश आढाव असे त्या कार चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
 
कारने एकापाठोपाठ तीन गाड्यांना जबर धकड दिली. त्यात एका दुचाकीवर एक इसम त्यांचे दोन मुलं आणि त्या इसमाची आई जात होती. त्या दुचाकीला कराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, हे चौघेही ७० ते ८० फूट पुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.