सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:12 IST)

Glowing Skin साठी घरगुती फेस पॅक

बहुतेक लोक काळी वर्तुळे, मुरुम, सुरकुत्या इत्यादींनी त्रस्त असतात. अशात आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक वापरा- 
 
1. लिंबू आणि मध मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 10-15 मिनिटांनी धुऊन घ्या.
2.  स्वच्छ त्वचेसाठी 4- 5 स्ट्रॉबेरीचा पेस्ट तयार करुन चेहरा आणि मानेवर लावा.
3  स्किन मॉइस्चराइज करण्यासाठी एक बाउलमध्ये 1 चमचा एलोवेरा जेल आणि 1 चमचा काकडीचा पल्प मिसळून लावा. 30 मिनिटांनी धुऊन घ्या.
4.  ग्लोसाठी 2 चमचे बेसन आणि जरा दूध मिसळून चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटांनी धुऊन घ्या.
5 मुरुमांपासून मुक्ती हवी असल्यास मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिसळून चेहर्‍यावर लावा. वाळल्यावर धुऊन टाका.
6. हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. हळदीचा अर्क त्वचेची चमक वेगाने वाढवते.
7 तांदूळ उकळल्यानंतर उरलेलं पाणी फेण्याऐवजी त्याने चेहरा स्वच्छ करा. काळे डाग, सुरकुत्या इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करेल.