1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (07:58 IST)

अहमदनगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य उपलब्धता

Free availability
भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील व परीवाराने नगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य उपलब्धता करुन देत रुग्‍णांना मोठा दिलासा दिला आहे.
 
राहाता तालुक्यात एक हजार रुग्णांकरिता सुविधा होईल आशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आ.विखे पाटील यांनी सांगितले.
 
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोव्हीड रूग्णांची संख्या जास्‍त वाढल्याने रेमडीसिव्हर इंजक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
परंतू इजक्शनंचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून, वाढीव दराने होत असलेल्या विक्रीतून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आ.विखे आणि आणि खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात तिनशे रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता करून दिली.
 
तिनशे पैकी शंभर इंजक्शन येथील शिर्डी सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल, लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि नगर येथील सिव्हील रुग्णालयास देण्यात येणार आहेत.शिर्डी येथील श्री.साईबाबा सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये शंभर इंजक्शन आ.विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
 
आ.विखे पाटील म्हणाले की, कोव्हीडच्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता राहाता तालुक्यात सर्व रुग्णालय मिळून आता एक हजार रुग्णांची व्यवस्था होईल आशा पध्दतीची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न हा बहुदा राज्यातील पहीला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.