शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

घरोघरी बाप्पाचे आगमन

बुद्धीची देवता श्री गणेश, विघ्नहर्ता विघ्नेश्‍वर, मंगलमूर्ती मोरया. ओंकारस्वरूप गणनायक. अर्थातच, गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा अशा लाडक्‍या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मंगलमय सोहळ्याचा प्रारंभ भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अर्थात आजपासून  होत आहे. हा सोहळा तब्बल बारा दिवस चालणार असून उत्तरोउत्तर तो रंगत जाणार आहे. घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. घरोघरी, मंडळांमध्ये धुमधडाक्यात बाप्पांचं स्वागत करण्यात येत आहे. ढोल-ताशे, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले जात आहे.  सार्वजनिक  मंडळांचा उत्साह  शिगेला पोहोचला आहे. 

मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणाऱा अशी ख्याती असलेल्या सिद्धीविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली आहे. तर मुंबईच्या सिद्धिविनायकाची गणेशोत्सवातली पहिली आरतीदेखील झालेली आहे. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या आरतीला साथ लाभली ती वाद्यांचा बादशाह असलेल्या शिवमणी यांनी यावेळी वाद्य वाजवून सिद्धिविनायकाची आरती केली.