शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (09:12 IST)

प्रदूषणामुळे गणपती बाप्पा काळे पडले

मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसापासून काळी पडत आहे. मूर्तीकार रंग देऊन पाहतो. मात्र पुन्हा 24 तासात मूर्तीचा रंग काळा पडतो.
 
दावडी गावातील तुकाराम चौकानजीक ओम साई मित्र मंडळ 11 वर्षापासून गणोशोत्सव साजरा करत आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी सांगितले की, त्यांनी दावडीच्या राजाची मोठी मूर्ती व त्याच्या समोर पूजनासाठी असलेली लहान मूर्ती दहा सप्टेंबरला आणली. दोन दिवस सजावटीमुळे तिच्यावरील प्लास्टीक काढले नाही. मूर्ती 13 सप्टेंबर रोजी मंडपात विधीवत पूजेसह स्थापन केली. पहिल्या दिवसापासून मूर्ती काळसर होत गेली. मूर्ती काळी पडण्याचे प्रमाण पाचव्या दिवशी जास्त होते. त्यानंतर संतोष पानेरकर यांच्याकडून ही मूर्ती आणल्याने त्यांना पाचारण केले. त्यांच्याकडून मूर्तीला पुन्हा रंग मारला. मात्र अवघ्या चोवीस तासाच्या आतच सहाव्या दिवशी पून्हा मूर्ती काळी पडली. तसेच मूर्तीच्या समोर पूजेची लहान मूर्ती ही त्यापेक्षा जास्त प्रमाणात काळी पडली. प्रदूषणाच्या दुष्परिणामामुळे मूर्ती काळी पडल्याचे सांगण्यात आले आहे.