रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (13:02 IST)

नवज्योतसिंग सिध्दू पाकिस्तानचे एजंट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार्‍या नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी टीका केली आहे. नवज्योतसिंग हे पाकिस्तानचे नवे एजंट असून ते पाकचे बोलके बाहुले आहेत. त्यांना पाकच्या तालावर नाचू द्या. पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या. आता राहुल गांधी सिद्धूंवर कारवाई करणार का?, असा प्रश्न हरसिरत यांनी विचारला आहे.
 
सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पाऊल उचलावे आणि पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री व पंजाबमधील अकाली दलाच्या नेत्या हरसिरत यांनी सिद्धू यांच्यावर टीका केली. सिद्धू यांनी शीख समाजाची दिशाभूल केली आहे. पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोरला हिरवा कंदील देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत भारत सरकारकडे पाकिस्तानने पत्रव्यवहारदेखील केलेला नाही, असे हरसिमरत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बाजवा यांनी करतारपूर कॉरिडॉर भारतातील शीख बांधवांसाठी खुला करण्याची तयारी दर्शवल्याने त्यांची गळाभेट घेतल्याचे सिद्धू सांगतात. पण ते दिशाभूल करत आहेत. सिद्धू भारतात आल्यावर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.