बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (17:27 IST)

गोव्यात काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

गोव्यात काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. 2017 च्या निवडणुकांत काँग्रेस हा 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 13 जागांवर विजय मिळाला होता. इतर पक्षांनी 10 जागेवर आपले उमेदवार विजयी केले आहेत. दुसरीकडे मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीत उपचार सुरु आहेत. 
 
दरम्यान, सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये व एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून व त्यांचे म्हणणो जाणून घेऊन भाजपमधील प्राप्त स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा मुख्यमंत्री  हा भाजपमधूनच निवडला जावा असे वाटते, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण बाहेरून जो नेता येईल, त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावे असा मुद्दा मांडत आहे.