मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (09:08 IST)

पेटंट मिळवण्यासाठी महाराष्ट्र पुढे

स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून गेल्या वर्षी साडेतीन हजारांहून अधिक अर्ज करण्यात आले असून याबाबत राज्याने अग्रस्थान घेतले आहे. याबाबतचा २०१६-१७ चा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात विविध राज्यांतून पेटंटसाठी ४५,४४४ अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे.
 
राज्यातून गेल्या वर्षी पेटंटसाठी तब्बल ३,५१३ अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, २०१५-१६च्या तुलनेत महाराष्ट्रातून ४ टक्के पेटंट अर्ज  कमी दाखल झाले आहेत. पेटंटसाठी अर्ज करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे तर सर्वात पिछाडीवर हिमाचल प्रदेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू २००३ अर्जासह दुसऱ्या तर कर्नाटक १७६४ पेटंट अर्जासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अन्य राज्यांची याबाबतची स्थिती अशी. (कंसातील आकडे संबंधित राज्यांच्या अर्जाचे) दिल्ली (१०६६), तेलंगणा (७९८), उत्तर प्रदेश (६२५), गुजरात (६२०), पश्चिम बंगाल (४६०), हरियाणा (४४१), केरळ (२७६), आंध्र प्रदेश (२७१), पंजाब (२०७), राजस्थान (१८१), झारखंड (१४४), मध्य प्रदेश (१४०), ओरिसा (१०३), आसाम (६८), उत्तराखंड (६४), जम्मू-काश्मीर (४९), हिमाचल प्रदेश (४०).