1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (15:50 IST)

गडकरी शब्द पाळतात, गंगा नदी स्वच्छ होणार : आनंद महिंद्रा

anand mahindra
गंगा नदी मार्च २०२० पर्यंत पुर्णपणे स्वच्छ केली जाईल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. याच दाव्याच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी अशाप्रकारची आश्वासने अनेक पंतप्रधानांनी दिल्याचे ट्विटवरून म्हटले आहे.
 
या ट्विटमध्ये महिंद्रा म्हणतात, प्रत्येक सरकारने गंगा नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. मला चांगले आठवतेय जेव्हा राजीव गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते त्यांनी देशाला उद्देशून एक उत्तम आणि भावनिक भाषण केले होते. त्या भाषणामध्येही त्यांनी यासंदर्भात (गंगा नदी स्वच्छता अभियानाबद्दल) काम करण्याची महत्वाकांक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी ते भाषण ऐकून माझे डोळे पाणावले होते. मात्र आता नितीन गडकरी यांनी गंगा नदी स्वच्छ करण्याचा शब्द दिला आहे. आणि गडकरी तेव्हा शब्द देतात तेव्हा तो शब्द ते पाळतात यावर माझा विश्वास आहे असेही ते या ट्विटमध्ये म्हटले आहे.