1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यात पहिल्यांदा यांत्रिक पद्धतीने गणेश विसर्जन, 83 लाख खर्च

kolhapur
कोल्हापूर-  यंदा येथे महापालिकेने एक वेगळाच विसर्जन सोहळा आयोजित केला असून यात स्वयंचलित यंत्र उभारण्यात आलं आणि तांत्रिक पद्धतीनं विसर्जन सोहळा साजरा करण्यात आला.
 
शहरात 5 दिवसाच्या घरगुती गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला तेव्हा इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्राद्वारे विसर्जन केले गेले.
 
यंत्राद्वारे गणेश मूर्ती पाण्यात सोडल्या जात होत्या. हा वेगळा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून तब्बल 83 लाख रुपये खर्चून ही यंत्रणा इराणी खण येथे बसवण्यात आली आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
 
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड ठेवण्यात येतात आणि नंतर या सर्व गणेशमूर्ती महानगरपालिका इराणी खण येथे घेऊन येते आणि येथील खणीत मूर्ती विसर्जन करण्यात येते.