सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:29 IST)

धार्मिक कार्यक्रमात सिगारेट उघडपणे ओढत अश्लील हावभाव असलेला डान्स विडीओ व्हायरल

in a religious program of Tarun Mandal in Kolhapur has gone viral
कोल्हापुरातील तरुण मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव असलेला डान्स विडीओ व्हायरल झाला आहे. या डान्सच्या ठिकाणी काही तृतीयपंथीय महिला आणि इतर सिगारेट सुद्धा उघडपणे ओढत असताना दिसून येत आहेत. मिरवणूकीत डिजेच्या तालावर मुली आणि तृतीयपंथी अश्लील भाव करत डान्स करत होत्या. इतकंच नाही तर त्या खुलेआम सिगारेटही ओढताना दिसताय.
 
त्याचबरोबर शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव आणि उघडपणे धूम्रपान आणि त्याचबरोबर गांजाचा वापर झाला आहे, त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केलीय. ही मागणी करत असताना तालीम मंडळाला दोषी न धरता ज्यांनी ही कृती केलीय त्याच्यावरच गुन्हा दाखल करावा अस शिवसैनिकांनी म्हटलंय.