शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (11:14 IST)

Rain Update :राज्यातील या भागात विजांसह मुसळधार पाऊस, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट

cyclone
सध्या सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र ते ईशान्य बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. हवामान खात्यानं राज्यातील उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर.या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलं आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.