शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (09:39 IST)

हात तोडता आला नाही तर पाय तोडा- प्रकाश सुर्वे

Prakash Surve
शिवसेनेतील दोन गटांमध्ये निर्माण झालेला बेबनाव आता धमक्यांवरुन प्रक्षोभक भाषेपर्यंत पोहोचला आहे. एकमेकांना बघून घेऊची भाषा आता पुढच्या टप्प्यावर गेली आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून होणारी विधाने संपल्यावर आता शिंदे गटाच्या आमदारांनीही अशाच प्रकारची भाषा सुरू केली आहे. शिवसेनेचे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी असेच विधान केले आहे.
 
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "आपण गाफिल राहायचं नाही. यांना यांची जागा दाखवून द्यायची. कुणी आरे केले तर त्याला कारे करा आणि ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नाही तोडता आला तर पाय तोडा. दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो."
 
"आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण आमच्या अंगावर कुणी आले तर त्याला शिंगावर घेऊन कोथळा फाडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा प्रकाश सुर्वे यांनी दिला.