शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (13:11 IST)

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या मृत्यू बाबत मेटेंच्या पत्नीकडून महत्त्वाचा खुलासा!

vinayak mete
Vinayak Mete Update :विनायक मेटे यांच्या अपघाताच्या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तर काहींनी हा घात असल्याचा दावा केला आहे. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात नेमका कोणत्या ठिकाणी झाला, ही गोष्ट चालक सांगू शकत नव्हता. एकनाथ कदम असे या चालकाचे नाव असून हा चालक मेटे यांच्याकडे अनेक वर्षांपासून कामाला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या सर्वच रस्त्यांची व्यवस्थित माहिती आहे. अशा वेळी चालकांना अपघात कोणत्या जागी झाला हे माहित नसणे संदेहास्पद असल्याचे वक्तव्य त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या की  मी गाडीच्या चालकाशी बोलले तर त्यांना देखील अपघात कुठे झाला हे सांगता आले नाही. गेल्या काही वर्षांपासून तो आमच्या सोबत असून त्यांना महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांची चांगलीच माहिती आहे. त्यांना काय आमच्या सर्व चालकांना महाराष्ट्रातील रस्त्यांची खडानखडा  माहिती आहे. त्यामुळे चालकाने अपघात कुठे झाला हे सांगता न येणं हे उत्तर खटकण्यासारखे आहे. 

तसेच मेटे साहेबांच्या मृत्यूशी निगडित अनेक गोष्टी आहेत ज्या संशयास्पद आहे.मेटे साहेबांच्या मृत्यूची जी वेळ सांगत आहे त्यावेळे पेक्षा आधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. हे मला त्याच वेळी समजलं होत. मी स्वतः डॉक्टर आहे. 
आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत आहे. काही कच्चे दुवे आहेत, त्यांची संगती लागत नाही. विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक असणाऱ्या एकनाथने अपघात झाल्यानंतर आम्हाला फोन करण्याऐवजी पोलिसांना फोन करायला हवा होता. त्याने असं का केलं, हेच कळत नाही. काही तरी असं आहे जे 
दडवले जात असल्याचं विनायक मेटे यांच्या पत्नीने म्हटले आहे.