Kirit Somaiya on Anil Parab :शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्याचं किरीट सोमय्यांचं सूचक ट्वीट !
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन मंत्री आणि महत्त्वांच्या नेत्यांविरोधात आरोपांची यादीच सादर केली होती. या यादीत अनिल परब यांचे नाव देखील होते.दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून या रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच या रिसॉर्टच्या साठी त्यांनी गैरमार्गाने कामविलेल्या पैशाचा वापर केल्याचा आरोप देखील त्यांनी केला. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर पर्यावरण मंत्रालयाकडून हातोडा पडणार असल्याचे सूचक ट्वीट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. आपल्या ट्विट मध्ये त्यांनी येत्या दोन ते चार दिवसात रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित असल्याचे सोमय्यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.
....