मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (19:45 IST)

Ganeshotsav 2021: कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाप्पाचे ऑनलाईन दर्शन

यंदा 10 सप्टेंबरला घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.पण यंदा सलग दुसर्याद वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने आता कडक नियमावलीत, अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्येच गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे.
  
मुंबईत गणेशोत्सव काळात 24 तास गणपती मंडळांमध्ये गर्दी असते. चलतचित्र, आकर्षक देखावे पाहण्यासाठी तोबा गर्दी असते. पण यावर्षी कोरोना संकटामुळे यावर निर्बंध आहेत. लालबाग, परळ,गिरगाव भागामध्ये असणारी अनेक गणेश मंडळं यंदा भाविकांच्या गर्दीविना सुनी सुनी असणार आहेत. पण बाप्पा आणि त्यांच्या भाविकांमधील अंतर कमी करण्यासाठी सुरक्षित दर्शनासाठी अनेक मंडळांनी यावर्षी ऑनलाईन दर्शन खुले ठेवलं आहे. राज्य सरकारने यावर्षी जारी केलेल्या कोविड 19 नियमावलीनुसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये 4 फूटाची मूर्ती असेल. तसेच मंडपामध्ये 5 पेक्षा अधिक लोकांना एकावेळी परवानगी नसेल.