मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (15:49 IST)

बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास कसून चौकशी

परिवहन विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांची ईडीने तब्बल ८ तास चौकशी केली आहे. अखेर ८ तासांच्या चौकशीनंतर बजरंग खरमाटे ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहे.या कालावधीत ईडीने खरमाटे यांची चौकशी केली असून त्यांच्या मोबाईलची छाननी केली आहे.यामुळे यामधून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.अनेक तास चौकशी सुरु असल्यामुळे आजच खरमाटेंना अटक करण्यात येतेय की काय अशी शक्यता होती. मात्र त्यांना कार्यालयातून सोडण्यात आलं आहे.बजरंग खरमाटे यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात येत असून चौकशी सुरु आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यामुळे अनिल परब यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
 
आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे सोमवारी सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाले होता. ईडीकडून सलग ८ तास खरमाटे यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली आहे.तसेच मुलगा, पत्नी आणि खरमाटे यांचे चारही फोनची ईडीकडून छाननी करण्यात आली आहे.यापूर्वी ईडीने बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेवर छापा टाकला होता.नागपूर,मुंबई आणि सांगलीतून महत्त्वाची कागदपत्रे ईडीने जप्त केली होती.
 
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मर्जीतील परिवहन विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रात्री उशीरा पर्यंत चौकशी सुरु होती.रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या चौकशीमुळे खरमाटे यांना अटक होईल अशी चर्चा सुरु होती. खरमाटे यांच्यावरील ईडीचा फास घट्ट होताना दिसत असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरी नुकतीच ईडीने छापेमारी करून काही महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतले होते.या कागदपत्रा संदर्भात चौकशीसाठी खरमाटे यांना ईडीकडून समन्स बजवण्यात आले होते, व त्यांना सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते.बजरंग खरमाटे यांच्यावर परिवहन विभागातील अधिकारी यांच्या बदली आणि पोस्टिंगमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप एका निलंबित अधिकारी यांनी केला होता.
 
बजरंग खरमाटे यांना ईडीने समन्स बजावले होते. सोमवारी खरमाटे ईडी कार्यालयात दुपारी १२ वाजता दाखल झाले होते.यानंतर ईडीने खरमाटेंची चौकशी सुरु केली.ईडीने त्याच्या संपत्तीबाबत तसेच परिवहन विभागात झालेल्या बदल्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात ईडीने अनिल परब याना देखील चौकशीसाठी समन्स बजावले होते, मात्र परब यांनी वकिलामार्फत ईडीकडे १४ दिवसाचा अवधी मागितली होती.