शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (17:57 IST)

पाच दिवसाच्या पोटच्या बाळाला विकणाऱ्या टोळीला अटक

baby legs
जन्मदात्यांनी आर्थिक फायद्यासाठी पोटच्या पोराला विकण्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. अवघ्या पाच दिवसाच्या बाळाला त्याच्याच जन्मदात्यांनी पैशासाठी तीन लाखात विकल्याचे समोर आले आहे. तीन लाखात हा सौदा ठरला होता, मात्र पोलिसांना कळल्यावर गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी विभागाने सापळा रचून जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर बाळाच्या आई-वडिलांसह आठ जणांना अटक केली आहे.  
 
मुलांची तस्करी करणाऱ्या अशाच एका टोळीला गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने अटक केलीआर्थिक फायद्यासाठी पाच दिवसांचे बाळ विकत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर हा सौदा होणार होता.माहिती मिळताच सापळा रचून या टोळीला अटक करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एका अविवाहित जोडप्याला शारीरिक संबंधातून हे बाळ जन्माला आले. त्यांना हे बाळ नकोसे झाले हे समजल्यावर बाळ विकणाऱ्या टोळीने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि लष्करीबाग येथील एका महिला ने त्या महिलेच्या बाळाला एका सामाजिक कार्यकर्त्याला विकण्यासाठी तीन लाख रुपयांचा सौदा केला. मानवी तस्कर सेल ला या संदर्भात माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचला आणि कार्यकर्त्याला डमी पैसे दिले. त्या महिलेने पैसे मिळाल्यावर बाळ कार्यकर्त्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे. 
 
या प्रकरणात एक डॉक्टर देखील सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आढळलेल्या डिस्चार्ज कार्डावरून एका 21 वर्षीय महिला आणि तिच्या प्रियकर मुकुल सुरेश वासनिक यांचे हे बाळ असल्याची माहिती मिळाली आहे. डॉ. कल्याणी डेव्हिड थॉमस या डॉक्टरांच्या मदतीने हे बाळ टोळीला विकले होते. डॉ. कल्याणी हिला देखील अटक केली असून एकूण नऊ जण या प्रकरणात आरोपी आहे. या आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.