बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (14:56 IST)

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी उर्वरीत जमिनींसाठी जाहीर झाला एवढा दर

railway track
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी सिन्नर तालुक्यातील उर्वरीत वडगांव पिंगळा, चिंचोली, मुसळगाव आणि मोह या चार गावाचे जमीनींचे दर निश्चित करण्यात आले असून, वाटाघाटीसाठी भूधारकांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.
 
या प्रसिद्धी प्रत्रकात नमूद केल्यानुसार, पुणे-नाशिक नविन दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी सिन्नर तालुक्यातील अकरा गांवातील प्रस्तावित खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असून, या गावांचे दर यापुर्वीच निश्चत करण्यात आले आहेत. या तालुक्यातील उर्वरीत वरील चार गावांचे जिल्हास्तारीय समितीने प्राथमिक जिरायत जमिनीचे दर हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमींनीसाठी प्रति हेक्टरी प्राथमिक दर निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.सिन्नर तालुक्यातील अकरा दर निश्चीत करण्यात आलेल्या गावांमध्ये मौजे बारागांवपिंप्री, पाटपिंप्री, दातली, वडझिरे, देशवंडी, दोडी बु. दोडी खुर्द, गोंदे, शिवाजी नगर, मानोरी व नांदुर शिंगोटे या अकरा गावांचा समावेश आहे. या निश्चित केलेल्या दरानुसार खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी महारेल व जमीन मालकांना पुढील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून या मुदतीचा भूधारकांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
 
त्याचप्रमाणे 30 मे 2022 रोजी मौजे शिवाजीनगर, नांदुर शिंगोटे, चिंचोली, मानोरी या गावांचे थेट खरेदीने ताब्यात घ्यावयाचे जमिनीचे हंगामी बागायत व बारमाही बागायत ही वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये संबधित गटाचे शिक्षण कर व रोहीयो कर पावती, Google Earth वरील KMZ व KML File 7/12 वरील मागील 3 वर्षांचे पिकपाहणी करण्यात येणार आहे. पीक पाहणी केल्यानंतर बागायत करीता मुळ जिरायत दराच्या दिडपट व बारमाही बागायत करीता दुप्पट असे मुल्यांकन दर निश्चीत करण्यात आले आहे. असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
गावाचे नाव…… जिरायत जमिनीचा प्राथमिक निश्चित केलेला प्रति हेक्टरी दर (रक्कम रु.)……. जिल्हा समितीने जिरायत जमिनीचा पाचपट प्रमाणे निश्चित केलेला प्रती हेक्टरी दर (रक्कम रु.)वडगांव पिंगळा….. 14,32,930/-……. 71,64,650/-चिंचोली……….. 33,21,550/-………. 1,61,07,750/-मुसळगाव ………16,66,250/-……… 83,31,250/-मोह ……….14,25,070/- …………71,25,350/-
 
तसेच दिनांक 30/05/2022 रोजी मौजे खालील गावांचे थेट खरेदीने ताब्यात घ्यावयाचे जमिनीचे हंगामी बागायत व बारमाही बागायत ही वर्गवारी निश्चित करण्यासाठी संबधित गटाचे गटाचे शिक्षण कर व रोहीयो कर पावती, Google Earth वरील KMZ व KML File 7/12 वरील मागील 3 वर्षांचे पिकपाहणी चा अभ्यास करुन हंगामी बागायत करीता मुळ जिरायत दराच्या दिडपट व बारमाही बागायत करीता दुप्पट असे मुल्यांकन मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहेत.
 
सदरचे मुल्यांकन हे खालील प्रमाणेगावाचे नाव जिल्हा समितीने जमिनीचा पाचपट प्रमाणे निश्चित केलेला प्रती हेक्टरी दर (रक्कम रु.)जिरायत…… हंगामी बागायत……… बारामाही बागायतशिवाजीनगर……… 53,19,300/- ………..79,78,950/- –नांदुर शिंगोटे……….. 72,32,800/- …….1,08,49,200/- ………1,44,65,600/-चिंचोली……… 1,61,07,750/-……….. 2,41,61,625/-……….. 3,22,15,500/-मानोरी ……..57,79,650/- ………86,69,475/-……… 1,15,59,300/-
 
उपरोक्त दरानुसार संबधित खातेदार यांना त्याच्या जमिनीचा व त्यावरील इतर घटक (फळझाडे, वनझाडे, पाईपलाईन, विहीर, बांधकाम, शेड व इतर) यांचा निश्चित करण्यात आलेला एकुण मोबदला उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) लघु पाटबंधारे, नाशिक यांचेमार्फत भुधारकांना कळविण्यात येणार असल्याचेही जिलहाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.