गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 1 जून 2022 (13:23 IST)

एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस

electric bus
लालपरीच्या अमृतमहोत्सवी वर्षात 1 जून रोजी एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’धावणार आहे, लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. राज्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला.  
 
विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, एसटी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात 1932 मध्ये खासगी सेवा सुरू झाली होती. त्यानंतर एक जून 1948 मध्ये एसटी महामंडळाची बस धावली. परदेशांमधील बसेस प्रमाणे ही नवीन बस असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा झाला नंतर त्याला मार्ग मिळाला. पण आता याला कोणाची दृष्ट लागू देऊ नका असे आवाहनही अजित पवार यांनी केले.