शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (16:13 IST)

पुण्यात पाणीपुरवठा बंद

Water supply
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी (2 जून) जवळपास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. गुरुवारी पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एसएनडीटी / वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत / पंपिंगविषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.