गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (14:31 IST)

जळगावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप

rape
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, जळगावातील पाचोरा तालुक्यातील एका गावातील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या गल्लीतील राहणाऱ्या एका मैत्रिणीसोबत बोलत असताना एकाएकी गायब झालेल्या पीडित मुलीचा कुटुंबीयांनी रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने शोधाशोध घेतला.  
 
मैत्रिणीशी बोलत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला उचलून नेले आणि तिच्या वर सामूहिक अत्याचार केले. नंतर तिला गावातील महिला शौचालयाजवळ सोडून पसार झाला.अल्पवयीन मुलीने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना या घटनेची माहिती देत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात हे पाच ते सहा आरोपी गावातील असल्याचे समजले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.