1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 11 जानेवारी 2023 (08:06 IST)

गौतम अदानी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

gautam adani raj thakceray
Twitter
गौतम अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला 
अदानी समुहाचे प्रमुख आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्रात विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यापैकी एका भेटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.  
 
गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट घेतली.
 
या भेटीनंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.  
 
यापूर्वी राज ठाकरे आणि टाटा समुहाचे रतन टाटा यांचा स्नेह असल्याचे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आले होते.
 
गौतम अदानी यांच्या समुहाला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या भेटींचा संदर्भ जोडला जात आहे.