पिंपरीत 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरेंची मुलाखत
पिंपरीत सुरु असलेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या मुलाखत कार्यक्रमात आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना ''आपल्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी बोलताना हजरजबाबीपणे सांगितले की ''हे आता मला त्यांना(बाळासाहेबांना) विचारणे शक्य नाही,'' त्यांच्या अशा उत्तरावर उपस्थितां मध्ये हशा पिकला.
बाळासाहेबांनी मला सांगितले आणि मी त्या प्रमाणे डेव्हिड लो या ब्रिटिश व्यंगचित्रकारांना फॉलो केलं. मी जे.जे . स्कूल ऑफ आर्टस् चा विद्यार्थी असून व्यंगचित्र चित्रकलेची शेवटची पायरी आहे. नाक कान डोळ्यांचा अभ्यास केल्याशिवाय व्यंगचित्र काढणं सोपं नसत. शाळेत असताना मी काही व्यंगचित्र काढले. आम्ही ब्रशने काम करणारी माणसे आहोत. त्यामुळे बाळासाहेबांनी माझी ब्रशची लाईन असो किंवा एखादी राजकीय निर्माण करणे असेल. हे त्यांनी सुरुवातीला पहिले असेल तर त्यावरून ते बोलले असतील. मी जे काही शिकलो ते माझ्या वडील आणि बाळासाहेबांकडून शिकलो असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit