1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Gautami Patil Audience riots in Gautami Patils program

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी

गौतमी पाटील ही नेहमी कोणत्या न कोणत्या वादात असते. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी मुळे प्रचंड गदारोळ झाला. आणि कार्यक्रम बंद करण्यात आला. 
 
लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी होणार नाही असे शक्यच नाही. पुन्हा एकदा गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली.नांदेडच्या धर्माबाद येथे गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मैदानात प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली. प्रेक्षकांमध्ये महिलांचा समावेश देखील होता. 
 
गौतमी कार्यक्रमासाठी रात्री नऊ वाजता मंचावर आली. तिला पाहून चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. मंचाजवळ प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. मैदानात ठेवलेल्या खुर्च्या मोडणार आल्या. झालेला गोंधळ पाहून पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरु केले. या मुळे परिसरात प्रेक्षकांची धावपळ सुरु झाली. गौतमीने प्रेक्षकांना शांत राहण्याचा सल्ला दिला पण प्रेक्षकांचा गोंधळ सुरु होता. गौतमीने दोन गाण्यावर नृत्य सादर केले आणि कार्यक्रम बंद करून निघून गेली. 
 

Edited by - Priya Dixit    
 
पुढील लेख
समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक