गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (18:38 IST)

मेडिकल शॉप मध्ये काम करताना हार्ट अटक ने मृत्यू

अलीकडे हार्टअटक ने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे प्रमाण दिसत आहे. अशीच घटना नांदेड शहरातील डॉक्टरलेन भागातील आहे. या भागातील एका हॉस्पिटल खाली औषधाच्या दुकानात सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दुकानात आल्यावर हिशोब करत  संगणकासमोर बसले होते. त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता. काम करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले असता त्यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. पवन तापडिया असे तरुणाचे नाव आहे.पवन दररोज प्रमाणे आपल्या मेडिकल शॉप मध्ये आले ते एक नामवंत व्यापारी होते. संगणकासमोर काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा  तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.     
 
 Edited By - Priya Dixit