रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (07:32 IST)

संजय शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

sanjay shirsat
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी महिला आयोगातही शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे आता शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
मागील आठवडय़ात छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे दिसताच शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली होती. मात्र, अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंधारे यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
 
आम्ही मध्यम वर्गी आहोत आम्हाला अब्रू जपायची असते. आम्हाला कुठल्या ही आर्थिक फायद्यासाठी हे करायचे नाही. कुठल्या ही पोलीस ठाण्यात माझी तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे 3 रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा मी शिरसाठ यांच्यावर दाखल केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor