1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (21:28 IST)

संजय शिरसाट हे ज्योषित आहेत का? , अशोक चव्हाण यांचा सवाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. यांच्या दाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे.
 
संजय शिरसाट हे ज्योषित आहेत का?, संजय शिरसाट यांच्या कोणत्याही वक्तव्याची फार दखल घेण्याची गरज नाही. त्यांना मंत्रिमंडळात न घेणे हे निश्चितच झालं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतच नाहीये. त्यामुळे त्यांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही. परंतु ते लवकरच जातील असं भाकीत आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी शिरसाट यांच्यावर पलटवार केला आहे.
 
पोपटानं संजय शिरसाट यांना भविष्यवाणी सांगितली का?, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. कालच आपण अशोक चव्हाणांचं भाषण ऐकलं. तरीही कुणी काहीही बोलत आहे. मला असं अजिबात वाटत नाही. परंतु आपण अशोक चव्हाण यांना विचारू शकता. माझ्यासोबत अशोक चव्हाणांची भेट झाली तर मी विचारीन, असं अजित पवार म्हणाले.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor