1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (16:26 IST)

गौतमी पाटीलचं खरं नाव वेगळंच, तिने स्वतः सांगितलं

प्रसिद्ध नृत्यांगना लावणी डान्सर गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला चाहत्यांची गर्दी असते. ती आता सध्या चर्चेत आहे. तिचा पुण्यातील जुन्नर येथे कार्यक्रम झाला. तिच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी भलीमोठी गर्दी केली होती. या वेळी एका चाहतीने तिची भेट घेतली. या मुलाखतीत तिने तिचे खरे नाव सर्वांना सांगितले. गौतमीने तिचे जन्मनाव वैष्णवी असल्याचे सांगितले. 
 
जुन्नरच्या केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गौतमीने तिथे भेट दिली. या वेळी गौतमी सारखी दिसणाऱ्या एका तरुणीने गौतमीची भेट घेतली 

एका व्यक्तीने तिची भेट गौतमीशी करून दिली. ती तरुणी दिसायला गौतमी सारखी असल्यामुळे तिला तिच्या शाळेत गौतमी म्हणून चिडवतात. या वेळी ती मुलगी आपलं नाव वैष्णवी असे सांगते. यावर गौतमी म्हणते की माझे पण जन्मनाव वैष्णवी आहे. तिचे खार नाव वैष्णवी असल्याचं गौतमी सर्वांना सांगते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit