गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2023 (11:13 IST)

गौतमीचा शो पोलिंसाकडून बंद!

gautmi patil
बार्शी येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गौतमीचा कार्यक्रम सुरू होणार होता पण  कार्यक्रमाला उशीर झाल्याने मोठ्या संख्येत प्रेक्षक वाट बघत उभे होते.  हा कार्यक्रम रात्री साडेनऊ दरम्यानच्या सुरु झाला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलचा शो आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता.बार्शी तालुक्यातील शहराच्या मुख्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  दहा वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेत डीजे बंद केले आणि कार्यक्रमदेखील बंद पाडायला भाग पाडले. यामुळे गौतमी पाटीलच्या लावणीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बार्शीकरांना एकाच गाण्यावर समाधान मानावे लागले.
 
साडेनऊच्या सुमारास लावणीला सुरुवात झाली. दहा वाजताच बार्शी पोलिसांनी ताबडतोब डीजे बंद करायला लावला. कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरा कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी किंवा गोंधळ नको अशी भूमिका घेत, पोलिसांनी लावणी कार्यक्रम बंद केला.